News Flash

ग्रंथदिंडीद्वारे सारस्वतांच्या महोत्सवाला सुरूवात

मराठी सारस्वतांच्या महाउत्सवास अर्थात ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला चिपळूण नगरीत सकाळी साठेआठ वाजता ग्रंथदिंडीने सुरूवात झाली. चिपळुणचे आमदार सदानंद चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते

| January 11, 2013 12:32 pm

मराठी सारस्वतांच्या महाउत्सवास अर्थात ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला चिपळूण नगरीत सकाळी साठेआठ वाजता ग्रंथदिंडीने सुरूवात झाली. चिपळुणचे आमदार सदानंद चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते ग्रंथदिंडीचे उद्‍घाटन करण्‍यात आले. या ग्रंथदिंडीमध्ये जवळपास पाच हजारांहून अधिक साहित्यरसिक सहभागी झाले होते. १५० वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराची स्थापना जेथून झाली तिथून निघालेली ही दिंडी शहरातून यशवंतराव चव्‍हाण संमेलनस्‍थळी पोहोचली. मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके आणि नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्यासह निमंत्रित आणि संमेलन प्रतिनिधी मोठय़ा संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.
त्यानंतर सकाळी ११ वाजता वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दुपारी ३ वाजता महामंडळाच्या उपाध्यक्षा उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून साडेतीन वाजता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्‍या हस्‍ते संमेलनाचे औपचारिक उद्‍घाटन होईल. याप्रसंगी मावळते अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, स्वागताध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथदिंडीमध्ये विविध संदेश देणारे फलक घेऊन शालेय विद्यार्थी आणि महाराष्ट्रीच्य़ा संस्कृ़तीचा अभिमान जागवणारे चित्ररथही यामध्ये सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 12:32 pm

Web Title: 86th sahitya sammelan started with granthadindi
Next Stories
1 रायगडात अवैध रेती उत्खननाला ऊत
2 रायगडात पाच वर्षांनी थंडीची लाट
3 सारस्वतांचा महोत्सव आजपासून
Just Now!
X