गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पुणे शहरातील प्रमुख ठिकाणी अत्यंत कमी तीव्रतेचे स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमुळे मनुष्यहानी झाली नव्हती. मात्र हे स्फोट म्हणजे पुढील मोठय़ा हल्ल्याची रंगीत तालीम असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने एका संशयिताला अटक केली आहे. बंटी जहागीरदार असं संशयिताचं नाव असून अहमदनगरमधून त्याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी पुणे स्फोटप्रकरणी डिसेंबर महिन्यात आणखी तिघांना अटक करण्यात आली होती आता या बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आठ झाली आहे. अटक केलेल्या सात आरोपींपैकी इमरान खान याला बंटीने शस्त्र पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. जहागीरदारला आज मोक्का कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.