News Flash

पर्यटकांचा आततायीपणा ठरतोय जीवघेणा

जिल्ह्य़ात महिन्याभरात ९ पर्यटकांचा निरनिराळ्या घटनांमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

रायगडमध्ये महिन्याभरात ९ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यत वर्षां पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा आततायीपणा जीवघेणा ठरतो आहे. जिल्ह्य़ात महिन्याभरात ९ पर्यटकांचा निरनिराळ्या घटनांमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील बहुतांश घटना या कर्जत आणि खालापूर तालुक्यांमध्ये घडल्या आहे. त्यामुळे वर्षां सहलींसाठी येणाऱ्या पर्यटकांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जुल महिन्याच्या ३ तारखेला चिल्लार नदीत बुडून सागर िपगळे याचा बडून मृत्यू झाला. आपल्या मित्रांसह तो नदीत पोहायला गेला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे पोहण्यासाठी तलावात गेलेल्या तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात भूषण संजय गवळे, तेजस सिद्धार्थ गवळे आणि आशीष मोहन गवळे या तिघांचा समावेश होता. हे तिघेही १२ ते १४ वयोगटातील होते. मुंबईतील जोगेश्वरी येथील विनोद मथुराम रेड्डी आणि गोरेगाव येथील अमित प्रकाश म्हात्रे हे कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणात वर्षां सहलीसाठी आले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. उरण तालुक्यात दांडा समुद्रकिनाऱ्यात निखिल पाटील याचा बुडून मृत्यू झाला. खोपोली येथील झेनिथ धबधब्यावर मनोज कुमार यादव बुडाला.  खालापूरजवळील उसरोली धरणात शशी भूषण शर्मा बुडाला होता. डोंबिवली येथील हर्षद भोळे हा पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता. मात्र पाय घसरून तो पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

कर्जत खालापूर हे तालुके वर्षां पर्यटनासाठी हॉट फेव्हरेट डेस्टिनेशन म्हणून ओळखले जातात. या परिसरातील डोंगरकडय़ावरून कोसळणारे धबधबे, ओसंडून वाहणारे नद्या-ओढे आणि तुडुंब भरलेली धरणे आणि बंधारे ही पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रिबदू ठरतात. मात्र निसर्गाचा आनंद लुटण्याच्या नादात योग्य खबरदारी न घेतल्याने हे ठिकाण जीवघेणी ठरत आहेत. उत्साहाच्या भरात केलेल साहस हा जिवाशी केलेला खेळ ठरतो आहे.

निसर्गाचा आनंद लुटताना स्वत:ची आणि आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात नदी-नाले दुथडी भरून वाहत असतात. पाण्याला जोर असतो. अतिवृष्टीच्या वेळी प्रवाहाचे पाणी वाढण्याची शक्यता असते. अचानक वाढणारा हा प्रवाह पर्यटकांसाठी धोकादायक ठरू शकतो. धबधब्यांच्या खाली आंघोळ करताना वरून दगडगोटे कोसळण्याची भीती असते. यामुळे भीषण अपघात होऊ शकतो. त्यामुळे पावासाचा जोर वाढल्यास नदी आणि धबधब्यापासून दूर राहणेचे योग्य ठरू शकते. नदीतील अंतर्गत प्रवाह, धोकादायक ठिकाणे यांची स्थानिकांना अचूक माहिती असते. त्यामुळे स्थानिकांच्या सूचना लक्षात घेणे गरजेचे असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 1:29 am

Web Title: 9 dead in raigad tourist places
Next Stories
1 इगतपुरी तालुक्यातील भावली धरण तुडुंब
2 वर्धनगड किल्ला शिवसेनेकडून दत्तक
3 बीपीएड महाविद्यालयांच्या शिक्षण शुल्काबाबत समितीच्या शिफारशी सादर
Just Now!
X