31 May 2020

News Flash

पाथरी-अंधापुरी रस्त्यावर बस उलटून ९ जखमी

पाथरी तालुक्यातील खराब रस्त्याचा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. रविवारी पाथरी-अंधापुरी रस्त्यावर महामंडळाची बस खड्डय़ांमुळे उलटली. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने

| June 9, 2014 01:10 am

पाथरी तालुक्यातील खराब रस्त्याचा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. रविवारी पाथरी-अंधापुरी रस्त्यावर महामंडळाची बस खड्डय़ांमुळे उलटली. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने हा अपघात झाला.
पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणारे सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहे. अगोदरच अरुंद असणाऱ्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. खड्डय़ांमुळे वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. अनेक गावांत खराब रस्त्यामुळे एसटी महामंडळाने बस बंद केल्या आहेत. पाथरी-अंधापुरी हा रस्ताही असाच त्रासदायक ठरला आहे. या रस्त्यावर एसटीच्या फेऱ्या दिवसभर सुरू असतात. अरुंद आणि खड्डेमय रस्त्यामुळे बसचालक वैतागले आहेत. बसचे नुकसान होत असतानाही प्रवासीसंख्या लक्षात घेऊन या रस्त्यावर दिवसभर बस चालवली जाते. नेहमीप्रमाणे रविवारी पाथरी-अंधापुरी (एमएच०६-८७९२) ही बस पाथरीहून अंधापुरीला सकाळी साडेआठ वाजता आली होती. परतीच्या प्रवासाला पाथरीकडे बस निघाली. उमरा येथून नऊ प्रवाशांना घेऊन निघालेली बस गौंडगाव शिवारातील जायकवाडी परिसरात आली असता स्टेअरिंगचा रॉड तुटला आणि बस बाजूच्या खड्डय़ात जाऊन उलटली. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. जखमींची नावे अशी- शेषराव निवृत्ती ढिगारे (वय ६०), गौतम लक्ष्मण जाधव (दोघे रा. गौंडगाव), चंद्रशेखर नंदकुमार कोल्हे (वय २०), हरिभाऊ दिवा शेळके (वय ६२), धर्मराज किशन हजारे (वय ६५), सीमा शिवाजी हजारे (वय २०), कौशल्या बिजुले (वय ६०, सर्व रा. उमरा), पंचफुला गणपत पायघन (वय ७०), नवनाथ पायघन (रा. खतगाव, जि. बीड) या जखमींवर पाथरीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2014 1:10 am

Web Title: 9 injured in road accident
टॅग Injured,Parbhani
Next Stories
1 ..आणि हेलिकॉप्टरची झाली ‘ढकलगाडी’!
2 उष्माघाताचे १७ बळी
3 नेत्यांवरील कारवाईची अधिकाऱ्याला ‘शिक्षा’!
Just Now!
X