13 December 2019

News Flash

अपघातात ९० टक्के तरुणच मृत्युमुखी

परिवहनमंत्री रावते यांची माहिती

(संग्रहित छायाचित्र)

आतापर्यंतच्या अपघाताचा आढावा घेतल्यास त्यामध्ये १९ ते ३५ या वयोगटातील तरुणांचा मृत्यू होत आहे. अपघाताच्या एकूण प्रमाणापकी ९० टक्के प्रमाण हे तरुणांच्या अपघातांचे आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. एखाद्या कुटुंबातील तरुणाचा अपघातात मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

येथील औद्योगिक वसाहत परिसरातील नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पालकमंत्री अतुल सावे, खासदार हेमंत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आमदार रामराव वडकुते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

रावते म्हणाले, आताची दुचाकी वाहने फायबरची असल्यामुळे त्यांचा चुराडा होत आहे आणि चालकाला गंभीर इजा होत आहे. तसेच पूर्वीच्या बसला लोखंडी पत्रा असायचा. मध्यंतरी त्याऐवजी अ‍ॅल्युमिनिअचा पत्रा टाकण्यात आला. त्यामुळे एखाद्या वाहनाशी टक्कर झाल्यास मोठी हानी होत असे. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या बसेसला लोखंडी पत्रा टाकण्याचे काम सुरू केले आहे.

अपघात विम्याबाबत बोलताना ते म्हणाले, की परिवहन खाते स्वीकारल्यानंतर हजारो खटले न्यायालयात पडून होते. काही वकिलांची फौज अपघातग्रस्तांना जास्त विमा मिळवून देण्यासाठी सक्रिय झाली होती. त्यामुळे सर्वात आधी खटले कमी करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on August 15, 2019 2:08 am

Web Title: 90 percent of the youth died in the accident abn 97
Just Now!
X