पनवेलपेक्षा अलिबागमध्ये उपचाराधीन रुग्ण जास्त, १७ जणांचा करोनाने मृत्यू

अलिबाग : रायगड जिल्ह्यात करनोबाधितांची संख्या घटण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात सलग तिसरम्य़ा दिवशी एक हजारहून कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत. २४ तासांत तब्बल १७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात ९०८ जणांना करोनाची लागण झाली. सक्रीय रुग्णांची संख्या १२ हजार ६२० वर पोहोचली. दिवसभरात १ हजार ०२० जणं उपचारानंतर बरे झाले आहेत. पनवेल महानगर पालिकेपेक्षा अलिबाग मध्ये उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ९०८ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यात पनवेल मनपा हद्दीतील तब्बल २२२, पनवेल ग्रामिण मधील १३२, उरण ५०, खालापूर ५३, कर्जत ३८, पेण ६३, अलिबाग १६४, मुरुड १४, माणगाव ३४, तळा ०, रोहा ६३, सुधागड ८, श्रीवर्धन ६, म्हसळा ०, महाड ५५, पोलादपूर ६ रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत ९, खालापूर १, कर्जत २, अलिबाग ३, पोलादपूर २,  अशा एकुण १७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या १२ हजार ६२० करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील २ हजार ८५७, पनवेल ग्रामिण हद्दीतील १ हजार ५१३, उरणमधील ६०४, खालापूर ९५१, कर्जत ४२३, पेण ७०५, अलिबाग ३ हजार ४६२, मुरुड ८८, माणगाव २७१, तळा २५, रोहा ९८८, सुधागड १५८, श्रीवर्धन ८६, म्हसळा ५२, महाड ३२७, पोलादपूर ११० रुगणांचा समावेश आहे. पनवेल महानगर पालिका हद्दीतील रुग्णवाढ नियंत्रणात आली आहे. मात्र अलिबाग तालुक्यात करोनावाढ अजूनही नियंत्रणात आलेली नाही. जिल्ह्यात पनवले पेक्षा अलिबाग मध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या जास्त आहे.

जिल्ह्यात १ लाख १६ हजार ५०९ जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील १ लाख १ हजार ३५३ जणांनी उपचारानंतर करोनावर मात केली आहे. तर २ हजार ५३३ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांचे प्रमाण ११ टक्कय़ावर आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्कय़ांवर आहे. तर मृत्यूदर २ टक्कय़ावर स्थिर आहे. जिल्ह्यातील १ हजार ३५१ रुग्णांना प्राणवायू पुरवठा करावा लागत आहे. तर ३८६ जणांना अतिदक्षता विभागात, तर १७२ जणांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. १० हजार हून अधिक रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरु आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४५ दिवसांवर आहे.

जिल्ह्यातील लसीकरण स्थिती

जिल्ह्यात ३ लाख ०४ हजार ५७४ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.  १ लाख ७३ हजार ९२७ पुरुष, १ लाख ३० हजार ६२५ महिला तर २२ इतर जणांचा समावेश आहे. २ लाख ५० हजार ०२७ जणांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ५४ हजार ५४७ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील ७४५ जणांचे रविवारी लसीकरण करण्यात आले.