21 October 2020

News Flash

योद्ध्यांचा यशस्वी लढा : ९६९ पोलिसांनी केली करोनावर मात

रविवारी आणखी ९१ पोलिस करोनाबाधित आढळून आले

संग्रहित छायाचित्र

ज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. करोनाविरुद्ध पहिल्या फळीत लढणाऱ्या पोलिसांना करोनाची मोठ्या संख्येनं लागण झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील ९१ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या २४१६ इतकी झाली आहे. तर २६ पोलिसांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे तब्बल ९६९ पोलिसांनी करोनाचा पराभव केला आहे. १४२१ करोनाबाधित पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत.

करोनाविरुद्ध देशाच्या सुरू असलेल्या युद्धात प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आदी दिवसरात्रं आपलं कर्तव्य बजावत आहेत. आपण घरात सुरक्षित रहावं म्हणून जीव धोक्यात घालून देशभराती पोलीस उन्हातान्हात रस्त्यांवर बंदोबस्तास उभे आहेत. या पोलिसांना देखील करोनाने घेरले असून त्यांचा जीव देखील धोक्यात आल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 1:15 pm

Web Title: 91 police personnel have tested positive for covid19 nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 …म्हणून शिवसेना आज भाजपासोबत नाही; शिवसेना नेते संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
2 सरकारी कार्यालयांसाठी नवे नियम : तीन फुटांचे अंतर, मास्क आवश्यक; दिवसातून तीनवेळा सॅनेटायझेशन
3 राजेंद्र जाधवांनी तयार केलेल्या ‘यशंवत’ची निर्मिती गाथा
Just Now!
X