महाराष्ट्रात ९ हजार १८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २९३ रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये ६ हजार ११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही ५ लाख २४ हजार ५१३ इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४७ हजार ७३५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत १८ हजार ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मागील २४ तासात ६ हजार ७११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ६८.३३ टक्के झाला आहे. मागील २४ तासांमध्ये ९ हजार १८१ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात मागील २४ तासात २९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर हा ३.४४ टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २७ लाख ७३ हजार ५२० रुग्णांच्या नमुन्यांपैकी ५ लाख २४ हजार ५१३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख १ हजार २६८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ३५ हजार ५२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

 

प्रमुख शहरांमधली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

मुंबई – १९ हजार १७२
ठाणे २० हजार ९६६
पुणे ४० हजार २७८
सातारा २ हजार ७५
सांगली २ हजार ६४९
कोल्हापूर ५ हजार ८३१
नागपूर ५ हजार ८९७