महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाने मार्च २०१५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून त्यात नगरचा निकाल ९२.२७ टक्के लागला आहे. उत्तीर्णामध्ये मुलींनी मुलांवर बाजी मारली आहे.
विज्ञान शाखेला २७२५२ विद्यार्थी परीक्षेस बसले, त्यांच्यापैकी २६४७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, कला शाखेत २०,६५३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यातील १७६७७ उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत ८०५१ विद्यार्थी परीक्षेस बसले तर ७५२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यावसायिक अभ्यासक्रमात १२०४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यात १०६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखा (९७.१६ टक्के). कला शाखा (८५.५९टक्के ), वाणिज्य शाखा (९३.४२ टक्के) , व्यावसायिक अभ्यासक्रम (८८.४६ टक्के) या प्रमाणे उत्तीर्णाची टक्केवारी आहे. जिल्ह्य़ात एकूण ५७१६० विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यातील ५२७४१ उत्तीर्ण झाले. जिल्ह्य़ात ३३४८९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यातील ३००८९ उत्तीर्ण झाले, २३६७१ विद्यार्थिनी परीक्षेस बसल्या त्यातील २२६५२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८९.८५ टक्के आहे. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९५.७० टक्के आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर गुणपत्रिका असून त्यांचा प्रिंटआउट घेण्यासाठी गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका महाविद्यालयात मिळतील.
तालुकानिहाय निकाल पुढील प्रमाणे- अकोले ९१.५३, जामखेड ९३.७, कर्जत ९४.१७, कोपरगाव ९१.४४, नगर ९१.१, नेवासे ८३.८३, पारनेर ९४.२, पाथर्डी-९३.१, राहता- ९३.९, राहुरी ९३.१, शेवगाव ९२.१, श्रीगोंदे ९२.४, श्रीरामपूर ९१.३४.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2015 3:37 am