News Flash

Maharashtra Corona Update : राज्यात ९,८१२ नवीन करोना रुग्णांची नोंद, १५६ रुग्णांचा मृत्यू

आज राज्यात ९,८१२ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ८,७५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

9,812 new corona patients registered in the state, 156 patients died
राज्यात आज दिवसभरात ८ हजार ७५२ रुग्णांची करोनावर मात

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला चांगलाच फटका बसला. आता करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, करोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचं आव्हान आता हळूहळू राज्यातील आणि देशातील आरोग्य यंत्रणांसमोर उभं राहू लागलं आहे. डेल्टा प्लस चे राज्यात सर्वाधिक रूग्ण आहेत. त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने उपाय योजना सुरु केल्या आहेत. दरम्यान, राज्यात करोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. शुक्रवारी १५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. तर आज (शनिवार) १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज दिवसभरात ८ हजार ७५२ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ लाख ८१ हजार ५५१ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे एकूण करोनाबाधितांच्या संख्येपैकी ९५.९३ टक्के इतके झाले आहे. ही आरोग्य यंत्रणांसाठी आणि राज्य सरकारसाठी देखील दिलासादायक बाब ठरली आहे.

आज राज्यात ९,८१२ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ८,७५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,८१,५५१ झाली आहे. तसेच राज्यात आज १७९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.० टक्के आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०८,३१,३३२ नमुन्यांपैकी ६०,२६,८४७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२८,२९९ रुग्ण घरी उपचार घेत आहेत. तर ४,२७२ रुग्ण संस्थात्मक क्कारंटाईन आहेत.

राज्यात विक्रमी लसीकरण

लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. राज्यात शनिवारी ७ लाख ०२ हजार ४३२ जणांचे लसीकरण झाले. हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. आतापर्यत राज्यात ३,०९,७९,४६९ जणांना लस देण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2021 7:57 pm

Web Title: 9812 new corona patients registered in the state 156 patients died srk 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 राज्यात विक्रमी लसीकरण; दिवसभरात ७ लाखाहून जास्त नागरिकांनी घेतली लस!
2 अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांची ईडीच्या कोठडीत रवानगी
3 चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांना दिलं जाहीर आव्हान, म्हणाले…
Just Now!
X