सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी आणखी ९९ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल बाधीत आले आहेत त्यामुळे आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या दोन हजार ३४८ तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३७ झाली आहे.

या सष्टेंबर महिन्याच्या बारा दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजार ६१ झाली आहे. मागील ऑगस्ट महिन्यामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या ९१३ झाली होती. या दोन महिन्यात करोना संसर्गाचा वेग वाढला आहे.

जिल्ह्यात शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ११६८ करोनाबाधित रुग्ण तंदुरुस्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात शनिवारी आणखी ९९ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल बाधीत आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.