03 March 2021

News Flash

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या परिचारकाला करोनाची लागण

या परिचारकाला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

संग्रहित छायाचित्र

औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात काम  एका परिचारकाला (Male Nurse) करोनाची लागण झाली आहे. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात काम करणारा हा परिचारक आहे. या परिचारकाची करोना चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर या परिचारकाला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. GMCH चे अधिष्ठाता डॉ. करण येलीकर यांनी ही माहिती दिली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले. हा परिचारक ३८ वर्षांचा आहे अशीही माहिती डॉ. येलीकर यांनी एएनआयला दिली.

औरंगाबादमध्ये रविवारी एका करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. या ५८ वर्षीय व्यक्तीला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. यानंतर या रुग्णाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आलं होतं. रविवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता घाटी रुग्णालयातल्याच एका परिचारकाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 1:12 pm

Web Title: a 38 year old male nurse at government medical college hospital gmch aurangabad has tested positive for covid19 scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 तबलिगी जमातने माफीनामा जाहीर करावा, मुस्लीम सत्यशोधक मंडळाची मागणी
2 Respect Mr. CM! काश्मीरपासून दक्षिणात्य राज्यांपर्यंत… देशभरातून होतंय उद्धव यांचं कौतुक
3 तबलिगी मरकज: दिल्लीत जे घडलं ते रोज टीव्हीवर दाखवण्याची गरज आहे का ? शरद पवारांचा सवाल
Just Now!
X