07 July 2020

News Flash

भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल

ऊसतोड मजुरांना पोलिसांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी केलं होतं ठिय्या आंदोलन

संग्रहीत

संचारबंदीत गावाकडे परतणाऱ्या आष्टी तालुक्यातील ऊसतोड मजुरांना पोलिसांनी मारहाण केल्याची समजताच भाजपा आमदार सुरेश धस यांनी बुधवारी रात्रीच खेड येथे जाऊन ठिय्या मांडला. पोलिसांची भूमिका आणि सरकारचे धोरण याविषयी टीकाही केली. त्यामुळे जिल्हाबंदी, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आमदार धस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र इतर जिल्ह्यात कामासाठी तसेच ऊस तोडणीसाठी गेलेले नागरिक परत येत आहेत. बुधवारी रात्री परजिल्ह्यात ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर आपल्या गावाकडे परतत असताना त्यांना खेड व भिगवण ( ता.कर्जत जि.अहमदनर) येथे जिल्ह्याच्या हद्दीत रोखून पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. ही घटना कळतात भाजपा आमदार सुरेश धस यांनी रात्रीच तात्काळ खेड येथे जाऊन ऊसतोड मजुरांची भेट घेतली पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रात्री दोन वाजता त्यांनी ठिया आंदोलनही केले. शिवाय पोलिसांचीची भूमिका आणि सरकारच्या धोरणावरही त्यांनी टिका केली.जिल्हा बंदीचे आदेश डावलून ऊसतोड मजुरांची भेट घेऊन ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी शुक्रवारी पोलीस नाईक प्रशांत क्षिरसागर यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 7:41 pm

Web Title: a case has been registered against bjp mla suresh dhas msr87
Next Stories
1 Coronavirus : मेयोतील करोनाची तपासणी करणाऱ्या पीसीआर यंत्रात बिघाड
2 लॉकडाउनमुळे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठकडून ऑनलाइन शिक्षण
3 नागपुरातल्या पाच मशिदींमधून ५२ लोक क्वारंटाइन, मरकजमध्ये झाले होते सहभागी
Just Now!
X