News Flash

बसस्थानकामध्ये पाकिटे चोरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीला अटक

दीक्षा भोसले (लिंब गोवे, ता. सातारा) असे संशयित चोरी करणाऱ्या युवतीचे नाव आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

वाई : सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये बॅगांमधून बिनधोकपणे पशांची पाकिटे चोरी करणारी महाविद्यालयीन तरुणी सीसीटीव्हीत कैद झाली असून, स्टँड चौकीतील पोलिसांनी तिला एका गुन्ह्यत अटक केली आहे. स्टँडमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही बसवले गेल्याने ही कारवाई होण्यास मदत झाली असून, ज्यांची पर्स, कागदपत्रे चोरी झाली आहेत त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान न्यायालयाने या युवतीची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.युवतीने पाकीट चोरीची कबुली दिली असून पाकीट चोरीची सवय असल्याचे पोलिसांना सांगितले.

दीक्षा भोसले (लिंब गोवे, ता. सातारा) असे संशयित चोरी करणाऱ्या युवतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अक्षदा जाधव ही युवती तिच्या आजीसोबत शिवाजीनगर येथे जाण्यासाठी सातारा एस.टी. स्टँडवर मंगळवारी दुपारी आली होती.

गर्दीच्या वेळी एस.टी.मध्ये जात असताना अज्ञात चोरट्याने तिची पशांची व कागदपत्रांची पर्स चोरी केली. ही बाब अक्षदाच्या लक्षात आल्यानंतर तिने एस.टी स्टँड पोलिस चौकीमध्ये धाव घेतली. चौकीतील पोलिस हवालदारांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात केल्यानंतर संशयित दीक्षा भोसले हिने पर्स चोरल्याचे फुटेजमध्ये दिसले. पोलिसांनी त्या युवतीला ताब्यात घेतल्यानंतर चोरीची कबुली दिली. दरम्यान, चोरीचे आणखी असे प्रयत्न केले असून तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, संशयित युवती सातारा येथे एका महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत आहे. उच्च शिक्षित युवतीकडून चोरीचे कृत्य घडल्याने  खळबळ उडाली आहे. पोलिस उपअधीक्षक डॉ.खंडेराव धरणे, पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता पवार, प्रवीण पवार, केतन िशदे, अरुण दगडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 3:07 am

Web Title: a college girl arrested for stealing packet at bus station in satara
Next Stories
1 पोलीस ठाण्यातच पोलिसाकडून महिला पोलिसाचा विनयभंग
2 कर्जतमध्ये आगळे तुफान, श्रमदान करत पदवीधर विवाहबद्ध
3 विदर्भात पावसाळी अधिवेशन; भाजपची मागणी उद्धव ठाकरे यांनी फेटाळली
Just Now!
X