News Flash

आता मास्क, सॅनिटायझरचे दरही निश्चित होणार; राज्य शासन नेमणार समिती

केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

प्रातिनिधीक छायाचित्र

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर वाढला असून याच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत एक समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, “करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. करोनावर सध्या तरी प्रतिबंधात्मक उपाय हेच औषध असल्याने आणि नागरिकांनाही वेळोवेळी मास्क आणि सॅनिटाजरचा वापर करण्याबाबत विविध माध्यमातून आवाहन केले जात असल्याने या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली आहे.

राज्य शासनाने यापूर्वी करोना रुग्णांकडून मनमानी पद्धतीने बिल आकारणी करणाऱ्या रुग्णालयांना शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे आकारणी करण्यास भाग पाडले आहे. त्याचबरोबर करोना चाचण्यांचे तसेच रुग्णवाहिकांसाठीही दर निश्चित करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत मास्क आणि सॅनिटायजर उपलब्ध व्हावे यासाठी त्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तू कायद्यातून मास्क व सॅनिटायझर वगळले आहे. मात्र, सध्या करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या दोन्ही वस्तूंचा समावेश पुन्हा त्या कायद्यामध्ये करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असून त्याबाबतचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 9:06 pm

Web Title: a committee will be appointed by the state government to fix the price of masks and sanitizers aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उस्मानाबाद उपकेंद्रातील प्रयोगशाळेचं काम पूर्ण; पुढच्या आठवड्यापासून करोना चाचण्या सुरु
2 ‘नया है वह’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…
3 चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाउनच्या निर्णयाचा पुरता गोंधळ; आणखी वाढवले सहा दिवस
Just Now!
X