कर्नाटकमध्ये भाजपा सर्वाधिक जागा मिळवत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र अद्याप पूर्ण बहुमत भाजपाला मिळालेले नाही. अशात जेडीएस म्हणजेच जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस यांनी आघाडी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच राज्यपालांकडे भेट घेण्यासाठी काँग्रेसचे नेते गेले असता राज्यपालांनी त्यांना सगळे निकाल येईपर्यंत कोणीही सत्ता स्थापनेसाठी दावा करू नये असे सांगितले आहे. पूर्ण निकाल येईपर्यंत राज्यपालांनीही वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली आहे.

काँग्रेस आणि जेडीएसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांच्याप्रमाणेच भाजपानेही सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस आणि जेडीएसने निकालाच्या दिवशीच हात मिळवणी केल्याने भाजपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निकालानंतर सगळे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपाची वाटचाल सर्वात मोठा पक्ष अशीच आहे. मात्र काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीमुळे भाजपाचा स्वप्न भंग होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.