News Flash

कोविड रूग्णालयातून फरार झालेल्या गुन्हेगारास कर्नाटकात अटक

चोरी प्रकरणात झाली होती अटक; अनेक गुन्हे आहेत दाखल

वर्धा येथील सेवाग्रामच्या कोविड रूग्णालयातून पसार झालेल्या गुन्हेगारास कर्नाटकातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

स्थानिक असलेला मोहम्मद शब्बार मोहम्मद शब्बीर याला चोरीच्या प्रकरणात कारागृहात पाठविण्यात आले होते. मात्र या ठिकाणी तो करोनाबाधित झाल्याने त्याला सेवाग्रामच्या कोविड रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर २२ एप्रिल रोजी तो रूग्णालयातून पळून गेला होता. त्यामूळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हिंगणघाटच्या गुन्हा शाखेस त्याचा तपास करण्याची जबाबदारी सोपविली होती. त्यानुसार पोलीस निरिक्षक शेखर डोंगरे यांच्या चमूने पांढरकवडा, आदीलाबाद, निजामाबाद व तेलंगणात त्याचा मागोवा घेतला. तेव्हा कर्नाटकातील बिदर येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. हिंगणघाट पोलीसांनी त्याला ताब्यात घेवून सेवाग्राम पोलीसांच्या हवाली केले आहे. हा आरोपी इराणी टोळीचा सदस्य असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहे. अन्य राज्यातदेखील त्याच्यावर गुन्हे नोद झालेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 7:43 pm

Web Title: a fugitive criminal from covid hospital has been arrested in karnataka msr 87
Next Stories
1 महाराष्ट्राचे माजी मंत्री संजय देवतळे यांचे करोनामुळे निधन
2 अडथळे पार करत हॉटेलच्या दारात पोहोचले, पण…; मुंबईतल्या पर्यटकांना महाबळेश्वरला जाणं पडलं महागात
3 २५ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयातीचा आरोग्य विभागाचा प्रस्ताव!
Just Now!
X