News Flash

काळजीपोटी वडिलांनी काढून घेतला मोबाइल, पण मुलीने रागाच्या भरात संपवलं आयुष्य

मुलीला मोबाइलचं व्यसन लागलं असल्याने वडिलांनी मोबाइल काढून घेतला होता

वडिलांनी मोबाइल काढून घेतल्याच्या रागात तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासापोरात ही घटना घडली आहे. मुलगी जास्त वेळ मोबाइलमध्ये घालवत असल्याने तरुणीच्या वडिलांनी मोबाइल काढून घेतला होता. पण यामुळे नाराज झालेली आपली मुलगी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलेलं याची त्यांना कल्पनाही नव्हती.

सोमवारी रात्री २२ वर्षीय श्रद्धा ढवळेच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. श्रद्धा बेपत्ता होण्याआधी तिच्या वडिलांनी तासनतास मोबाइलमध्ये वेळ घालवत असल्याने तिला सुनावलं होतं. मुलीला मोबाइलचं व्यसन लागलं असल्याने त्यांनी मोबाइल काढून घेतला होता. यामुळे रागावलेली श्रद्धा घरातून निघून गेली होती.

रात्री पावणेदहा वाजले तरी श्रद्धा घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी आणि शेजाऱ्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मुलीचा शोध लागत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि बेपत्ता झाल्याची तक्रार केली.

मंगळवारी जवळच्याच एका विहिरीत श्रद्धाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 12:06 pm

Web Title: a girl committed suicide after father takes away mobile
Next Stories
1 बुलेट ट्रेनमुळे खाडीतील अभयारण्य धोक्यात!
2 तपासणीआधीच उद्घाटन!
3 दापुरमाळच्या दुष्काळाशी तरुणांचे दोन हात!
Just Now!
X