08 March 2021

News Flash

‘अ’श्रेणीतील सर्वाधिक शाळा पुणे विभागात

‘शाळा सिद्धी’ उपक्रमात कोकण दुसऱ्या स्थानावर

शासनाने ‘प्रगत शाळा’ म्हणून हा उपक्रम राज्यात अमलात आणला आहे.

शाळा सिद्धीउपक्रमात कोकण दुसऱ्या स्थानावर

केंद्र शासनाच्या ‘शाळा सिद्धी’ उपक्रमात राज्यातील केवळ नऊ हजारांवर शाळा ‘अ’ श्रेणीस पात्र ठरल्या असून पुणे विभाग हा राज्यात अव्वल आला, तर कोकण दुसऱ्या स्थानावर आहे. देशभरातील शाळांचे मूल्यांकन करीत अव्वल शाळांना मानांकन प्रदान करण्याचा उपक्रम केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रथमच हाती घेतला आहे.

शासनाने ‘प्रगत शाळा’ म्हणून हा उपक्रम राज्यात अमलात आणला आहे. राज्यातील शंभर टक्के शाळा प्रगत करण्याचा चंग शासनाने बांधला आहे. पण पहिल्या फेरीत सर्व गटांतील प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील शाळांपैकी ९ हजार ३७० शाळा अ श्रेणीचा दावा करू शकल्या. प्रत्येक शाळेने काही निकषांवर स्वत:चे मूल्यमापन करीत ‘अ’ श्रेणीसाठी दावा करणे अपेक्षित होते. ३१ मार्चपर्यंत हे स्वयंमूल्यमापन सादर झाल्यानंतर हा उपक्रम हाताळणाऱ्या विद्या प्राधिकरणाने शाळांची यादी घोषित केली. यानंतर या ‘अ’ श्रेणीतील शाळांची तपासणी शिक्षण विभागाची चमू करणार आहे. त्यासाठी प्रशिक्षक ‘निर्धारक’ गट तयार करण्यात आले आहे.

विद्या प्राधिकरणाच्या उपसंचालक डॉ. शोभा खंदारे यांची स्वयंमूल्यमापनाबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना एका पत्रातून अवगत केले होते. इतर विभागांच्या तुलनेत विदर्भातील अमरावती व नागपूर या दोन्ही विभागांचा त्या पाश्र्वभूमीवर कमी प्रतिसाद लाभल्याचे चित्र उमटले. शासनाच्या तपासणीत ‘अ’ दर्जा सिद्ध करू शकणाऱ्या शाळांचे प्रस्ताव केंद्राकडे जातील. त्यानंतर देशपातळीवर या शाळांचे मूल्यांकन अभिप्रेत आहे.

दर्जा कसा ठरतो?

सात क्षेत्रांतील एकूण ७५ निकषांवर ही तपासणी होते. शाळेचे सामथ्र्य, अध्ययन व अध्यापन, विद्यार्थी प्रगती व विकास, शिक्षकांची कामगिरी व विकासाचे व्यवस्थापन, शालेय नेतृत्व व व्यवस्थापन, आरोग्य व संरक्षण, उत्पादक समाज सहभाग असे सहा क्षेत्र निकष आहेत. त्यात शाळेची स्वच्छता, क्रीडांगण, स्वयंपाकघर, विद्युत उपकरणे, पेयजल, वर्षभरातील उपक्रम, वर्ग व्यवस्थापन, शालेय कार्यक्रम, पटसंख्या, परिसर भेट, पायाभूत चाचणी, शिक्षकांचे नियोजन, शाळेचे घोषवाक्य, विशेष बालकांसाठी साहित्य, व्यसनमुक्त शाळा, स्वच्छतेचे उपक्रम, आपत्ती व्यवस्थापन व अन्य निकषांवर शाळेचा ‘अ’ दर्जा तपासला जातो.

अव्वल यादी

‘अ’ श्रेणीसाठी दावा करण्यात पुणे जिल्हा तसेच पुणे विभाग राज्यात आघाडीवर असून त्या पाठोपाठ कोकण विभाग आहे. विभागनिहाय ‘अ’ श्रेणी शाळांची संख्या याप्रमाणे- पुणे- २ हजार १४१, कोकण- १ हजार ५९२, नाशिक- १ हजार ३५१, कोल्हापूर- १ हजार २२२, नागपूर- ७९७, औरंगाबाद- ७२५, अमरावती- ६८८, मुंबई- ५४६, लातूर- ४८९, एकूण ९ हजार ३७० शाळा. पुणे- ९२८, सोलापूर- ७८६, ठाणे- ५४७ हे तीन जिल्हे राज्यात अनुक्रमे अव्वल आहेत. स्वयंमूल्यमापन प्रक्रियेनंतर शिक्षण विभाग या शाळांची ‘अ’ श्रेणीची पात्रता तपासणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 12:37 am

Web Title: a grade school in pune
Next Stories
1 कर्जमाफी नको असे म्हणून बंब यांनी शेतकऱ्यांशी गद्दारी केली- अंबादास दानवे
2 लाभाच्या पदांच्या नियमातून प्रतोदांना वगळण्याचा निर्णय
3 उत्तर प्रदेशच्या कर्जमाफी मॉडेलचा अभ्यास करणार: मुख्यमंत्री
Just Now!
X