12 July 2020

News Flash

खंडाळा येथून कोरियात गेलेली उच्च पदस्थ महिला करोनाबाधित

संबंधित महिलेच्या संपर्कातील 30 जणांची तपासणी सुरू

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथून कोरिया येथे पोहचलेली परराष्ट्र सेवेतील उच्चपदस्थ महिला तेथे गेल्यावर करोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने, या महिलेच्या संपर्कात आलेल्या 30 जणांची तपासणी् करण्यात  आली आहे. या तपासणीचे अहवाल प्रलंबि असून ते राहत असलेल्या भागात सर्व्हेक्षण अधिक तीव्र करण्यात आलेले आहे. मार्च महिन्यात सुट्टीवर खंडाळा येथे गावी आलेली महिला करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्याने भारतात अडकली होती.

दरम्यान कोरियाला जाण्यासाठी खंडाळा येथून ही महिला २८ एप्रिल रोजी मुंबई येथे गेली होती.  कोरियाला जाण्यासाठी भारतात असलेल्या सर्व जणांसाठी स्वतंत्र विमान पाठवून कोरिया देशात बोलावण्यात आले होते. माञ या व्यक्तींची तपासणी करावी असा स्पष्ट निर्देश असल्याने त्यांची तपासणी मुबंई येथे विमानतळावर नकारात्मक आल्यानंतर ते कोरियाला निघुन गेले.  तेथे गेल्यावर माञ संबंधित महिला करोनाबाधित असल्याचा अहवाल आला. याची माहिती परराष्ट्र खात्याकडुन जिल्हा प्रशासनास मिळाली. यानंतर जिल्हा प्रशासनाने खंडाळा या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या 30 जणां पैकी 25 जणांना शिरवळ येथे विलीगिकरण कक्षात तर पाच जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. अनुमानितांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ . अविनाश पाटील यांनी दिली . यामुळे परिसरात सर्वेक्षण तीव्र करण्यात आले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2020 8:42 am

Web Title: a high ranking woman who went to korea from khandala was found corona affected msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 “जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठीही एखादा सर्जिकल स्ट्राइक गाजावाजा न करता होऊ द्या”
2 अशोक चव्हाण यांच्याशी आज वेबसंवाद
3 Coronavirus Updates: महाराष्ट्रात करोनाचे नवे ८४१ रुग्ण, ३४ मृत्यू, संख्या १५ हजार ५०० च्या वर
Just Now!
X