25 February 2021

News Flash

३०० फुटी बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्यास सुखरूप बाहेर काढले

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील घटना

साधारण ३०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या एका सहा वर्षीय चिमुकल्यास सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. यासाठी एनडीआरएफसह स्थानिक पोलीस व नागिरकांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे या चिमुकल्यास जीवदान मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील बेज शिवारातील ही घटना आहे.

रितेश सोळंकी असे या सहा वर्षीय चिमूकल्याचे नाव आहे. सध्या त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. गुरूवारी सकाळी तो या बोअरवेलमध्ये पडला होता. त्यानंतर तो अंदाजे ५० फुटांवर अडकला होता. तेव्हापासून त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 8:16 pm

Web Title: a littile boy who had fallen into a 300 feet deep borewell has been rescued msr 87
Next Stories
1 शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सत्तेच्या दिशेनं एक पाऊल; ‘समान कार्यक्रम’ ठरला
2 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पुन्हा सुरु करा; धनंजय मुंडेंची राज्यपालांना विनंती
3 शिवसेनेचा सन्मान राखणं आमची जबाबदारी; मुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादीचे संकेत
Just Now!
X