News Flash

औरंगाबादमध्ये ३३ वर्षीय व्यक्तीने चक्क ब्रश गिळला आणि त्यानंतर….

सिटीस्कॅन पाहून डॉक्टरही चक्रावले

औरंगाबादमध्ये पोटदुखीचा त्रास झाला म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीची तपासणी केली असता डॉक्टरही चक्रावले. रुग्णाच्या पोटात चक्क टूथब्रश असल्याचं पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या ३३ वर्षीय रुग्णाने ब्रश गिळला होता. रुग्णाने ब्रश नेमका का गिळला आणि कसा? हा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. शेवटी डॉक्टरांनी रुग्णावर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला.

टूथब्रश गिळल्यानंतर रुग्णाच्या पोटात दुखू लागलं होतं. यामुळे त्याने औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी सिटीस्कॅन केलं असता त्याच्या पोटात लांबलचक टूथब्रश असल्याचं पहायला मिळाला. पोटात टूथब्रश पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. हा ब्रश जवळपास अर्धा फूट लांबीचा होता.

यानंतर डॉक्टरांनी रुग्णावर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. रुग्णावर यशस्वीपणे सर्जरी करुन ब्रश बाहेर काढण्यात आला. जवळपास दीड तास ही सर्जरी सुरु होती. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सा पथक क्रमांक-६ चे प्रमुख जुनेद एम. शेख, डॉ. अविनाश घाटगे, डॉ. ओमर खान, डॉ. संदीप चव्हाण, डॉ.सुकन्या विंचूरकर, डॉ.गौरवभावसार, भुलतज्ज्ञ डॉ. अनिकेत राखूडे,डॉ. विशाखा वाळके, अधिपरिचारिका संतोशी सोनगट्टी यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 9:55 am

Web Title: a man swallows toothbrush in aurangabad sgy 87
Next Stories
1 Dear NCB, कंगनाला चौकशीसाठी कधी बोलावणार?; काँग्रेसचा सवाल
2 “मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेनं दिला?”
3 रुंदीकरणात वृक्षांचा बळी
Just Now!
X