27 November 2020

News Flash

मुंबई-गोवा महामार्गावर तरुणाने धावत्या कारमध्ये कापून घेतली हाताची नस आणि त्यानंतर…

थरारक घटनेने खळबळ

मुंबई-गोवा महामार्गावर तरुणाने धावत्या कारमध्ये हाताची नस कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, खे़डमधील भरणे येथे हा प्रकार घडला. काही समाजसेवकांच्या मदतीने तरुणाला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

तरुण खेडमधील आपल्या सासुरवाडीतून साताऱ्याच्या दिशेने जात होता. यावेळी त्याने आपल्या कुटुंबीयांना फोन करुन आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. कुटुंबीयांनी तात्काळ खेडमधील काही ओळखीच्या लोकांना फोन करुन ही माहिती दिली. यानंतर तेथील तरुण समाजसेवकांनी शोध सुरु केला.

भरणे येथे तरुणाची स्विफ्ट कार दिसली असता समाजसेवकांनी पाठलाग केला. कार थांबवली असताना तरुणाने ब्लेडच्या सहाय्याने हाताची नस कापल्याचं ते चित्र पाहून सर्वांनाच धक्का बसला. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देत तरुणाला तात्काळ कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 11:07 am

Web Title: a man tried to commit suicide in car sgy 87
Next Stories
1 “ओबीसी म्हणजे…”, फडणवीसांवर टीका करणाऱ्या खडसेंविरोधात भाजपा आक्रमक
2 बंधाऱ्यांच्या उघडय़ा दरवाजांतून टंचाईचा प्रवेश?
3 डहाणूत सिमेंट कारखाना
Just Now!
X