14 December 2019

News Flash

धक्कादायक ! विचित्र वागण्याला कंटाळून आईने कापला १४ महिन्याच्या मुलीचा गळा

याआधी महिलेने चोराने घरात घुसून मुलीची हत्या केल्याचा दावा केला होता

महिलेने आपल्याच पोटच्या मुलीचा गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे महिलेने पोलिसांना मुलीच्या विचित्र वागण्याला कंटाळून आपण तिची हत्या केल्याचं सांगितलं आहे. योगिता मुकेश पवार असं आरोपी महिलेचं नाव आहे. याआधी महिलेने चोराने घरात घुसून मुलीची हत्या केल्याचा दावा केला होता.

पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी योगिता पवारने मुलीच्या विचित्र वागण्याला आपण कंटाळलो होतो, यामुळेच तिची गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत ही माहिती हाती आल्याचं सांगितलं आहे. पोलीस यामागे अजून काही कारण आहे का ? याचा तपास करत आहेत. आरोपी योगिता पवारला २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चोराने घरात घुसून १४ महिन्याच्या चिमुकलीचा हत्या केली, पालकांचा दावा; पण पोलिसांना संशय

याआधी आरोपी योगिता पवारने चोराने घरात घुसून मुलीची गळा कापून हत्या केल्याचा दावा पोलिसांकडे केला होता. आपण कचरा टाकण्यासाठी खाली गेलो होतो, घरी परतलो तेव्हा चोराने आपल्यावरही हल्ला केला अशी माहिती तिने पोलिसांना दिली होती. पोलिसांना मात्र घरातून एकाही वस्तूची चोरी न झाल्याने संशय होता. योगिता आणि चोरामध्ये झटापट झाल्याचंही कोणतं चिन्ह नव्हतं.

चौकशी केली असता योगिता पवारने विरोधाभास देणारी वक्तव्यं केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना इमारतीच्या लिफ्टमध्ये ब्लेड सापडलं तसंच रक्ताचे काही डाग होते ते योगिताच्या रक्ताचे असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर बुधवारी योगिताला अटक करण्यात आली.

First Published on July 19, 2019 1:50 pm

Web Title: a mother slits child throat fed up of daughters cranky behaviour nashik sgy 87
Just Now!
X