News Flash

नवजात बाळाचा मृतदेह हातात घेऊन वडील मागत होते न्याय !

संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी

डॉक्टरांच्या निष्काजीपणामुळे दांपत्याला आपलं नवजात बाळ गमवावं लागल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. दरम्यान संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बाळाचे वडिल रोशन विश्वकर्मा करत आहेत.

रोशन विश्वकर्मा एका खासगी कंपनीत फॅब्रिकेशन मध्ये काम करतात. ब-याच वर्षांनी त्यांची पत्नी गर्भवती राहिली आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण त्यांचा हा आनंद काही काळापुरता टिकला. खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने पिंपरी-चिंचवड मधील वायसीएम रुग्णालयात त्यांनी नोंदणी केली, त्यांना २६ मार्च तारीख देण्यात आली. २१ मार्च रोजी अचानक पत्नीच्या पोटात दुखू लागल्याने चाकणहून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणण्यात आले. सोनोग्राफीची अत्यंत गरज होती, परंतु तेथील महिला डॉक्टरांनी तपासणी न करताच दिलेल्या तारखेलाच या असे सांगितले. डॉक्टरांनी हाय रिस्क अशी चिठ्ठी दिली असतानाही त्याची दखल न घेता त्यांना परत पाठवण्यात आलं.

आहे त्या परिस्थितीत पत्नीला चाकण येथे घेऊन जाण्यात आलं. वेदना सहन करत रात्र गेली अन सकाळी ती घरातच बाळंतीण झाली. परत उपचारासाठी चाकणमधील रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. त्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पत्नीला चाकणहुन पुन्हा पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तोपर्यंत त्या पोटच्या गोळ्याने जीव सोडला होता. हा धक्का वडिलांना सहन झाला नाही. गरिबाला वाली नसतो असे म्हणत रोशन विश्वकर्मा हातात बाळाचा मृतदेह घेऊन न्यायासाठी फिरत होते. विशेष म्हणजे या अगोदर देखील प्रसूतीदरम्यान त्यांचं मुल दगावल होतं. पहिल्या वेळेस उपचारासाठी आले तेव्हा डॉक्टरांनी (High Risk)नावाची चिठ्ठी दिली होती. त्यावेळी गरोदर महिलेवर उपचार, सोनोग्राफी झाली असती तर ही वेळच अली नसती. त्यामुळे या प्रकरणात संबंधित डॉक्टरवर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2018 1:48 pm

Web Title: a newborn child dies because of doctor negligence
Next Stories
1 विधवा, घटस्फोटित महिलांना पिंपरी पालिकेचा मदतीचा हात
2 पार्किंगचा बोऱ्या : वाहनतळांची तोकडी व्यवस्था
3 पुरंदर विमानतळ पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी
Just Now!
X