News Flash

विमानात क्रू मेंबरची छेड काढणा-या पुणेकर आजोबांना अटक

लखनऊ - दिल्ली विमानात घडला प्रकार

एअर विस्तारा विमानात केबिन क्रू मेंबरने छेड काढल्याची तक्रार केल्यानंतर एका ६२ वर्षीय उद्योजकाला अटक करण्यात आली आहे. हा उद्याजोक मूळचा पुण्याचा असून एअर विस्ताराच्या लखनऊ – दिल्ली विमानाने प्रवास करताना हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. २४ मार्चला ही तक्रार करण्यात आली होती. त्याचदिवशी पोलिसांनी कारवाई करत राजीव वसंत दानी यांना अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी विमानतळावरच अटकेची कारवाई केली.

एअर विस्ताराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘२४ मार्च २०१८ ला लखनऊ – दिल्ली विमान UK997 मधील आमच्या एका क्रू मेंबरने एका प्रवाशाने छेड काढल्याची तक्रार केली. प्रवाशांकडून कर्मचा-यांना अपमानास्पद वागणूक मिळत असेल आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर एअर विस्तारा अजिबात सहन करणार नाही. आम्ही संबंधित विभागाकडे आणि पोलिसांकडे घटनेची तक्रार केली आहे. एफआयआर दाखल झाला असून तपास सुरु आहे. संबधित प्रशासनाला आम्ही पूर्ण सहकार्य करु’.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत २४ मार्चला विमानाचं लॅण्डिंग झाल्यानंतर बाहेर पडताना प्रवाशाने जाणुनबुजून क्रू मेम्बरला स्पर्श केला होता. आम्ही एफआयआर दाखल केला असून, तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 3:39 pm

Web Title: a passenger arrested for sexual harassment of crew member in vistara airlines
Next Stories
1 ‘मोदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटू शकतात तर मग आम्ही ममतांना का भेटू शकत नाही ?’
2 छत्तीसगडमध्ये भाजपा नेत्यावर कु-हाडीने वार, पोलीस स्थानकापासून 200 मीटरवर हत्या
3 जायचं होतं नवी दिल्ली, ट्रेन पोहोचली जुनी दिल्ली; प्रवासी हैराण
Just Now!
X