रांगोळी, कंदील, फटाके, फराळ अशा सर्व गोष्टींप्रमाणेच दिवाळीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे किल्ले. दिवाळीच्या सुट्टीत घराच्या आवारात महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांसारखी प्रतिकृती उभारण्याची जुनी परंपरा सध्याच्या ‘स्मार्टफोन’ युगातही कायम असल्याचे दिसून येत आहे.

कल्याणमधील रामबाग परिसरात विशाळगड आणि पन्हाळगड यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बांधणीची प्रथा कशी सुरू झाली, याबाबत ठोस तपशील उपलब्ध नाहीत. मात्र, किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्याचा लहान मुलांचा सुट्टीतील विरंगुळा जणू परंपराच बनला आहे.