09 July 2020

News Flash

कृषी अधिकारी म्हणून मुलींची लक्षणीय संख्येत निवड

निवडलेल्या ९० टक्के महिला शेतकरी कुटुंबातील

निवडलेल्या ९० टक्के महिला शेतकरी कुटुंबातील

लोकसत्ता, प्रशांत देशमुख 

वर्धा : महिलांसाठी लांबच्या समजल्या जाणाऱ्या कृषी खात्यात प्रथमच लक्षणीय संख्येत कृषी अधिकारी म्हणून मुलींची निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने कृषी सेवा गट?ब अंतर्गत ८३ उमेदवारांची शिफारस कृषी खात्याकडे केली आहे. यापैकी जवळपास एक तृतियांश महिला असून परिविक्षाधीन कालावधीसाठी कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती प्रस्तावित आहे. शिक्षणात वैद्यकीय व अभियांत्रिकीपाठोपाठ कृषी शिक्षणास प्राधान्य मिळत असल्याचे कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी चाललेल्या चढाओढीतून दिसून येते. कृषी खात्यात महिला अधिकाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी  आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने निवड झालेल्या महिला अधिकाऱ्यांमुळे आगामी काळात कृषी खात्याची सूत्रे महिलांकडे जाण्याची चिन्हे आहेत.

निवडप्राप्त सर्व महिलांना एक महिन्याच्या आत रूजू व्हायचे आहे. महिला आरक्षित पदावर शिफारस झालेल्या महिला उमेदवारांच्या प्रमाणपत्राची तपासणी महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात येणार आहे. नेमणूक झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमास हजेरी लावणे अनिवार्य आहे.

कृषी विभागातील ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यासंदर्भात म्हणाल्या, कृषी खात्यात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती स्वागतार्ह आहे. निवड झालेल्या ९० टक्के महिला या शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीविषयक प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न त्या अधिक तत्परतेने सोडवण्याची अपेक्षा आहे.

निवड झालेल्या महिला व नियुक्तीस्थान

संगीता भाऊसाहेब पवार (सिल्लोड), अश्विनी दिलीप कुंभार (देवळी), प्रियंका विनायक जगताप (जालना), अश्विनी संभाजी कोरे (सावनेर), शुभांगी अशोक ढगे (बीड), हर्षदा नानासाहेब जगताप (औरंगाबाद), प्रिया सिद्धेश्वर नवने (जालना), पूनम आप्पा चव्हाण (औरंगाबाद), माधुरी महादेव सुरवसे (लातूर), मुक्ताबाई तुकाराम कोकाटे (भातुकली), भाग्यश्री बबनराव भोसले (नांदेड), आरती आनंदराव बोरस्ते (नांदेड), मनीषा बाबासाहेब गवळी (राळेगाव), मनीषा अनिल पाटील (भंडारा), मोहिनी आप्पासो जाधव (भद्रावती), स्नेहल भीमराव शिंदे (शेगाव), प्रतिभा सुभाष कुताळ (कळम), अमृता अशोक सूतार (वर्धा), सुरभी राजेंद्र बाविस्कर (कुरखेडा), कीर्ती दिनकर मोडक (अकोला), सुप्रिया विजय वायवळ (आर्वी), विधा शबाजी मांडलिक (कोर्ची), काव्यश्री मोहन घोलक (रिसोड), कावेरी सुभाष साळे (गोंदिया).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 3:25 am

Web Title: a significant number of girls were selected as agricultural officers zws 70
Next Stories
1 व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची कासवगती!
2 दामू गायकवाड  यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान
3 वैद्यकीय विद्यार्थ्यांत समाजभान निर्माण करणारी ‘सेवांकुर’
Just Now!
X