30 September 2020

News Flash

धक्कादायक! मुलाने संपवलं अख्खं कुटुंब, वृद्ध आई-वडील आणि बहिणीची निर्घृण हत्या

सांगलीच्या जत तालुक्यातील उमदीमध्ये ही घटना घडली आहे

तरुणाने आपले आई-वडिल आणि बहिणीची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील उमदीमध्ये ही घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी तपास सुरु आहे.

सांगलीच्या जत तालुक्यातील उमदीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. सख्या मुलानेच आपल्या वृद्ध आई-वडिल आणि बहिणीची निर्घृण हत्या केल्याचं समोर आले आहे. गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (८२), नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (७५) आणि समुद्राबाई बिरादार (६२) अशी या मृतांची नावे आहेत.

संशयित आरोपी सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (५८) याने तिघांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून घटनास्थळी उमदी आणि जत पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2020 1:24 pm

Web Title: a son killed family in sangli over land dispute sgy 87
Next Stories
1 “मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झालं तर….”, धनजंय मुंडेंनी दिलं उत्तर
2 नुसत्या घोषणेनं रडत राऊतची तंतरली; मनसेचं जळजळीत प्रत्युत्तर
3 “त्या भीतीने उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ सोडून ‘वर्षा’ बंगल्यावर जाणार नाहीत”
Just Now!
X