09 March 2021

News Flash

५२ वर्षीय सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरोपी मोबाइलवर पॉर्न पाहत असे आणि जेव्हा कधी पत्नी घरी नसायची तेव्हा मुलीवर बलात्कार करायचा.

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका ५२ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी पीडित मुलीचा सावत्र बाप असून गेल्या तीन महिन्यापासून मुलीवर बलात्कार करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबाइलवर पॉर्न पाहत असे आणि जेव्हा केव्हा पत्नी घरी नसायची तेव्हा मुलीवर बलात्कार करायचा.

पोलीस तक्रारीत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, २००८ मध्ये तिचा आरोपीशी विवाह झाला. “आपल्या पहिल्या पतीपासून ही मुलगी झाली. लैंगिक अत्याचार होत असल्या कारणाने तिच्या अभ्यासावरही परिणाम होत असून तिचं अभ्यासावर लक्ष लागत नाही.” असं पीडित मुलीच्या आईने सांगितलं.

जर या घटनेची कुठेही वाच्यता केली तर आईला आणि तुझ्या मामाला मारुन टाकेन अशी धमकी आरोपीने दिल्याचं पीडित मुलीने सांगितलं आहे.

ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा मुलीची आई तिला एका कार्यक्रमानिमित्त भावाच्या घरी घेऊन जाणार होती. आरोपीने मुलीला घेऊन जाण्यास नकार दिला. यामुळे मुलीच्या आईला संशय आला. ती परत आली तेव्हा मुलगी आजारी होती. तिने मुलीला भावाच्या घरी नेलं आणि चौकशी केली. यावेळी मुलीने आई आणि मामाला सगळा प्रकार सांगितला.

मुलीच्या आईने तात्काळ एका एनजीओशी संपर्क साधत पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 2:15 pm

Web Title: a step father rapes minor girl
Next Stories
1 भाजपा-राष्ट्रवादीचे लफडे जुनेच, उद्धव ठाकरेंची टीका
2 धुळे महापालिकेत भाजपाचा महापौर, काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार
3 ठाणे, मुंबईला पाठवण्यात येणारा मोठा शस्त्रसाठा जप्त, दोघा आरोपींना अटक
Just Now!
X