28 February 2021

News Flash

मोबाइल चार्जरने गळफास घेऊन १४ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

अभ्यास करायचा असल्याचं सांगत तो घरी थांबला होता

(प्रतिकात्मक छायाचित्र)

औरंगाबादमध्ये एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलगा इंग्लिश मीडियममध्ये आठवीत शिकत होता. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याने आत्महत्या केली. अभ्यास करायचा असल्याचं सांगत तो घरी थांबला होता. मोबाइल चार्जरच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केली. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हर्सूल परिसरातील मयूरपार्क भगतसिंग नगर येथे राहणार्‍या प्रद्युम्न राजू हिवाळे(१४) याने घरी एकटा असताना गळफास घेतला. ही घटना घडली त्यावेळी वडील कामावर गेले होते. तर आई देवदर्शनासाठी खुल्ताबादला आणि मोठा भाऊ ट्यूशनसाठी गेला होता. आईने सोबत देवदर्शनाला येण्याचा आग्रह केला होता. पण प्रद्युम्नने खूप अभ्यास असल्याचे कारण देत जाणे टाळले होते.

दार तोडून प्रद्युम्नचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. प्रद्युम्न च्या आत्महत्येने हर्सूल परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 1:15 am

Web Title: a student committed suicide with help of mobile charger
Next Stories
1 थंडीमुळे द्राक्ष निर्यात गोठण्याची भीती
2 कोकणात पाणी वाचविण्याची चळवळ उभारल्यास ‘नाम’ची मदत  -नाना पाटेकर
3 नवीन पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा!
Just Now!
X