पुणे-बंगळूरु महामार्गावर कराडजवळ दोन मोटारींमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पुण्यातील तीन पैलवानांचा समावेश आहे. हे तिघेही कात्रज परिसरातील रहिवासी असल्याचे सुत्रांकडून कळते.
लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या दोन मोटारींमध्ये हा भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महामार्गावर कराड जवळच्या आटके टप्पा येथे हा अपघात झाला असून अपघातग्रस्त एक मोटार कोल्हापूरवरुन पुण्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या मोटारीने पुढे असणाऱ्या मोटारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पुढील मोटार पलटी झाली.
या भीषण अपघातात दोन्ही मोटारीतील मिळून चार जण ठार झाले आहेत. यातील जखमींना कराडच्या कृष्णा हॅास्पिटल येथे दाखल करणात आले आहे. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरु करण्यात आले आहेत. घटनास्थळी महामार्ग पोलीस तसेच कराड पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 9:32 pm