20 September 2020

News Flash

औरंगाबादमध्ये महिलेला विवस्त्र करुन मारहाण, कपडे देण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांची अडवणूक

अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही

औरंगाबादमध्ये एका महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिल्लोड येथे हा प्रकार घडला आहे. जमिनीच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे नातेवाईकांकडूनच ही मारहाण करण्यात आली. पोलीस ठाण्यात गेली असता तक्रार दाखल करुन घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीवरुन असलेल्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली. जमीन महिलेच्या आईच्या नावे आहे. काकाची जमिनीवर नजर असून त्यांनी तेथे येण्यास आम्हाला प्रतिबंध केल्याचा महिलेचा आरोप आहे. तिथे गेली असता आपल्याला आणि आईला पिटाळून लावल्याचंही महिलेने सांगितलं आहे.

याच जमिनीच्या वादातून नातेवाईकांना विवस्त्र होईपर्यंत महिलेला मारहाण केली. यावेळी काही ग्रामस्थांनी पुढे येऊन महिलेला कपडे देण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी त्यांनाही अडवणूक केली. सिल्लोड पोलीस ठाण्यात गेली असता तक्रार नोंद करुन घेतली गेली नसल्याचा महिलेचा आरोप आहे. एक नातेवाईक पोलिसांत असल्याने पोलीस दुर्लक्ष करत असल्याचं महिलेचं म्हणणं आहे. महिला होमगार्ड म्हणून काम करत होती अशी माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपण तक्रार करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 1:37 pm

Web Title: a woman beaten over land dispute in aurangabad
Next Stories
1 तुम्ही माढ्याच्या मागे का लागलात, शरद पवार यांचा सवाल
2 ५६ इंच छाती केवळ भाषणापुरतीच, सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका
3 Lok Sabha Election 2019: युतीचा पहिला धक्का शिवसेनेला, अहमदनगरमधील नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Just Now!
X