22 October 2020

News Flash

फेसबुकवर मैत्री करणं ५० वर्षीय महिलेला पडलं महागात, १७ लाखांचा गंडा

महिलेने पोलिसांत तक्रार केली असून तपास सुरु आहे

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. बँक कर्मचारी असलेल्या ५० वर्षीय महिलेला १७ लाख ६० हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. ‘मार्च ते मे २०१८ दरम्यान महिलेची फसवणूक करण्यात आली. मार्च २०१८ मध्ये आरोपीने फेसबुकवर महिलेशी मैत्री केली होती. आपण वॉशिंग्टन डीसीमध्ये राहत असल्याची माहिती त्याने दिली होती. महिलेचा विश्वास जिंकल्यानंतर त्याने पत्ता मागून घेतला होता. तुमच्या मुलासाठी लॅपटॉप, मोबाइल आणि ब्रॅण्डेड परफ्यूम पाठवत असल्याचं त्याने सांगितलं होतं’, अशी माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली आहे.

यानंतर एका महिलेने पीडित महिलेशी संपर्क साधत आपण दिल्ली कस्टम विभागाकडून बोलत असल्याची बतावणी केली. अमेरिकेहून तुमचं पार्सल आणि परदेशी चलन आलं असून तुम्ही ते सीमाशुल्क भरुन घेतलं नाही तर तुम्हाला पोलीस चौकशीला सामोरं जावं लागेल असं सांगण्यात आलं. यानंतर एका व्यक्तीने फोन करुन महिलेला तुमचं पार्सल घेऊन अलिबागला आलो असल्याचं सांगितलं.

त्या व्यक्तीने महिलेकडे लॉकर सोपवत यामध्ये डॉलर आणि भेटवस्तू असल्याचं सांगितलं. पासवर्ड मिळाल्यानंतर आपण परत येऊ असं सांगून तो तेथून निघून गेला अशी माहिती दशरथ पाटील यांनी दिली आहे. दुसऱ्या दिवशी महिलेला एका व्यक्तीने फोन करुन तुमच्याकडे अमेरिकन डॉलर असल्यास अडचणीत येऊ शकता असं सागत मदत देऊ केली. त्याने पैसे पाठवण्यासठी आसाम आणि कोलकातामधील नऊ खात्यांची माहिती दिली. महिलेने या खात्यांमध्ये एकूण १७ लाख ६० हजार पाठवले.

आपल्या मुलाशी बोललल्यानंतर फसवूणक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं. महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. पोलीस यासंबंधी तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 12:40 pm

Web Title: a woman cheated by 17 lakh by facebook friend
Next Stories
1 विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, समिती सदस्याने शिवीगाळ केल्याचा आरोप
2 बाकीचे नालायक ठरल्याशिवाय मनसेची आठवण येत नाही: राज ठाकरे
3 बोनस दिला जातो मग शेतकऱ्यांना अनुदान का नाही ? : राजू शेट्टी
Just Now!
X