News Flash

सांगलीत तीन लेकरांसह विहिरीत उडी मारुन महिलेची आत्महत्या

कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे

सांगलीत विवाहित महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे. महिलेने विहिरीत उडी मारल्याची माहिती मिळताच त्यांचा शोध सुरु झाला होता. अखेर चार तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालं.

30 वर्षीय राधिका सुभाष कोळी असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. राधिका कोळी यांनी आपल्या तीन मुलांसह मध्यरात्री यल्लम्मा विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. राधिका कोळी यांच्यासहित त्यांची मुलं हर्षल (4), प्रज्वल (3) आणि चिताका (2) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाली असावी असा संशय व्यक्त केली आहे. विहीर खोल असल्याने बराच वेळ मृतदेह शोधण्याचं काम सुरु होतं. चार तासानंतर मृतदेह हाती लागले. दरम्यान या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 3:22 pm

Web Title: a woman committed suicide jumping in well sangli
Next Stories
1 पाणी येत नसल्याची तक्रार केल्याने भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबास मारहाण
2 आम्ही चार वर्षात १ कोटी २५ लाख घरे बांधली – नरेंद्र मोदी
3 मल्ल्याचा मल्हारराव होळकर झाला, जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त ट्विट; धनगर समाजात संताप
Just Now!
X