07 August 2020

News Flash

अल्पवयीन मुलाला पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या महिलेवर ‘पॉस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल

संबंधित महिलेचा पतीही खून प्रकरणात पोलीस कोठडीत आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

इचलकरंजी येथील अल्पवयीन मुलाला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या महिलेवर शनिवारी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित महिलेचा पतीही खून प्रकरणात पोलीस कोठडीत आहे.

इचलकरंजी शहरातील आसरा नगर परिसरात ९ महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार इचलकरंजी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू होता. चार दिवसांपूर्वी पोलिसांना अल्पवयीन मुलगा सोलापूर येथे असल्याचा सुगावा लागला . पोलिसांनी त्याला इचलकरंजीत आणून चौकशी केली असता महिलेने तामिळनाडू येथे पळवून नेऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे त्याने सांगितले. त्यावरून महिलेला ताब्यात घेऊन तिच्याविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 8:30 pm

Web Title: a woman has been charged under poxo for sexually abusing a minor boy msr 87
Next Stories
1 १९६२ चं चीन युद्ध विसरु नका, शरद पवार यांचा राहुल गांधींना सल्ला!
2 करोनावर इंजेक्शन आहे मात्र ते आपल्याला परवडणारं नाही : शरद पवार
3 इचलकरंजी पाणी योजनेच्या विरोधासाठी दुधगंगा नदीवर धरणे आंदोलन
Just Now!
X