News Flash

व्यसनाला कंटाळून महिलेकडून पोटच्या मुलाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

आपल्या २७ वर्षीय मुलाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली

प्रतिकात्मक छायाचित्र

दारुच्या व्यसनाला कंटाळून महिलेने पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्यात ही घटना घडली आहे. महिलेने आपल्या २७ वर्षीय मुलाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. मुलगा दारुसाठी पैसे मिळावेत यासाठी वारंवार महिलेला त्रास देत होता. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने त्याची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आपली आई जया आणि वडिल बलराम यांच्यासोबत राहत होता. त्याला दारुचं प्रचंड व्यसन होतं. संतोष हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. संतोषची पत्नी त्याला कंटाळून सहा महिन्यांपूर्वी आपल्या नवजात बाळासोबत घर सोडून निघून गेली होती.

संतोषची आई जया घरकाम करायची. तो तिला पैशांसाठी नेहमी त्रास देत असे. जया यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९ वाजता संतोषने दारुसाठी पैसे मिळावेत यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी नकार दिल्यानंतर संतोष कुऱ्हाड घेऊन अंगावर धावत आला. यावेळी जया यांनी कुऱ्हाड त्याच्या हातातून खेचून घेत त्याच्यावर वार केले. संतोष याचा तेथेच मृत्यू झाला.

बलराम त्यावेळी घरात उपस्थित होते. त्यांनी शेजाऱ्यांकडे धाव घेत मदत मागितली. पोलीस पोहोचले तेव्हा जया मुलाच्या मृतदेहाशेजारीच बसल्या होत्या. त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 5:10 pm

Web Title: a woman killed alchoholic son in nalasopara
Next Stories
1 पोलिसांच्या कडक बंदोबस्तात श्रीपाद छिंदमची पालिकेच्या सभेला हजेरी
2 ७ ऑगस्टपर्यंत मागण्यांवर विचार न झाल्यास ठिय्या आंदोलन : सकल मराठा मोर्चा
3 मराठा समाजाला कायद्याच्या पातळीवर टिकेल असे आरक्षण देण्यास कटिबद्ध : मुख्यमंत्री
Just Now!
X