News Flash

पालघर : मित्राचे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर भररस्त्यात तलवारीने वार

नालासोपाऱ्यात भर रस्त्यात तलवारीचा रक्तरंजित थरार

प्रतिकात्मक छायाचित्र

नालासोपारा शहरात काही तरुणांनी भर रस्त्यात तलवारीने एकावर हल्ला केल्याची चित्रफित सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मित्राच्या भांडणात मध्यस्ती कऱण्यासाठी गेलेल्या एका तरुणांवर चौघांची तलवारीने हल्ला केला. तुळींज पोलिसांनी याप्रकऱणी एकाला अटक केली आहे.

नालासोपारा पुर्वेच्या प्रगती नगरमध्ये सोमवार २९ जून रोजी ही घटना घडली होती. मात्र, त्याची चित्रफित सोशल मीडियावर आल्यानंतर घटनेचे गांभीर्य समोर आले. तुळींज पोलिसांच्या माहितीनुसार, संजय मिश्रा (वय २२) याचा मित्र सलमान याचे तीन मित्रांशी भांडण सुरू होते. ते सोडविण्यासाठी संजय मध्ये पडला. त्यामुळे सलीम, नूर आणि पप्पू या तीन आरोपींनी तलवारीने आणि बांबूने संजयवर हल्ला केला. त्यात तो जबर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संजयच्या फिर्यादीवरून तुळींज पोलिसांनी चार आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी गुरूवारी एका आरोपीला अटक कऱण्यात आली असून अन्य तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. हे सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावविरोधात यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 1:19 pm

Web Title: a young man who went to settle a friends quarrel was attacked with a sword in nalasopara in palghar district aau 85
Next Stories
1 पत्नीची हत्या केल्यावर सैनिकाची आत्महत्या; वर्ध्यातील घटना
2 धक्कादायक आकडेवारी: महाराष्ट्रात महिनाभरात वाढले एक लाख करोनाबाधित रुग्ण
3 रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांचा नवा उच्चांक
Just Now!
X