25 October 2020

News Flash

आदेश बांदेकर यांच्या कारला अपघात

बांदेकर अपघातातून थोडक्यात बचावले.

आदेश बांदेकर

‘भावोजी’ म्हणून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले अभिनेते आदेश बांदेकर यांच्या कारला कराड रोडवर अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला असून सुदैवाने ते या अपघातातून सुखरुप बचावले.

आदेश बांदेकर हे सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असून मंदिराच्या वतीने एक कोटीचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यासाठी ते निघाले होते. यावेळी कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. मात्र, सीटबेल्ट लावला असल्याने बांदेकर यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरूप आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिराचे इतर विश्वस्तही होते. मात्र कोणालाही दुखापत झाली नाही. फक्त गाडीचे किरकोळ नुकसान झाले. गणपती बाप्पाच्या कृपेने या अपघातातून बचावलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 6:52 pm

Web Title: aadesh bandekar car accident at karad road
Next Stories
1 कीटकनाशकप्रकरणी कोणत्या आधारावर एसआयटीने अहवाल तयार केला?: हायकोर्ट
2 मटणाच्या दुकानासंदर्भातील वादातून पैठणमध्ये जोरदार हाणामारी
3 सत्तेला लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव देणार: धनंजय मुंडे
Just Now!
X