प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, ३० नोव्हेंबरची मुदत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतक ऱ्यांचा डाटा आधार संलग्न असेल तरच या योजनेचा हप्ता संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. परंतु जिल्ह्य़ात अद्यापि सुमारे ३ लाखावर शेतक ऱ्यांचा डाटा आधार लिंक झालेला नाही. यासाठी आता केंद्र सरकारने शेतक ऱ्यांना दोन दिवसांची म्हणजे ३० नोव्हेंबरची मुदत दिली आहे. याशिवाय जिल्ह्य़ातील सुमारे ५० हजार शेतक ऱ्यांनी या योजनेसाठी नाव नोंदणी न केल्याचा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. नाव नोंदणी केलेल्या सुमारे ४० हजार शेतक ऱ्यांच्या माहितीत चुका आढळल्या आहेत.

शेतक ऱ्यांनी नागरी सुविधा केंद्राशी (आपलं सरकार केंद्र) संपर्क करून आपला डाटा ३० नोव्हेंबपर्यंत आधार सलग्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. डाटा दुरुस्तीसाठी नागरी सुविधा केंद्रात केवळ १० रुपये व नवीन नाव नोंदणीसाठी केवळ १५ रुपये शुल्क आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यापेक्षा अधिक शुल्क केंद्रांनी आकारू नये, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी केली आहे.

आतापर्यंत २ लाख ७४ हजार ७३० शेतकऱ्यांना योजनेचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे, नंतर अपात्र ठरल्याने, मृत्यू, स्थलांतर आदी कारणाने दुसरा हप्ता २ लाख ६९ हजार शेतक ऱ्यांना दुसरा हप्ता वर्ग करण्यात आला तर तिसरा हप्ता ६२ हजार शेतक ऱ्यांसाठी वर्ग करण्यात आला आहे. परंतु आता योजनेसाठी आधार संलग्नतेचे बंधन टाकण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीपुर्वी फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार प्रत्येकी २ हजार रुपये या प्रमाणे ३ हप्त्यात वर्षभरात एकूण ६ हजार रुपयांचा निधी शेतक ऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. पूर्वी या योजनेसाठी आधार सलग्नची अट नव्हती. नंतर १ ऑगस्टपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली, आता ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अंदाजानुसार जिल्ह्य़ात योजनेसाठी सुमारे ५ लाख ४४ हजार शेतकरी लाभार्थी असण्याची शक्यता आहे. त्यातील सुमारे ४ लाख ९३ हजार शेतक ऱ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने जमा झालेली आहे.

मात्र यामध्ये संबंधित शेतक ऱ्याची बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक व इतर माहितीत तफावत आढळत आहे. यासाठी चुकीची दुरुस्ती करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी टपाल विभागाच्या बँकेनेही पुढाकार घेतला आहे. टपाल बँक हे काम मोफत करत आहे. अशा सुमारे ७० ते ७५ हजार शेतक ऱ्यांच्या डाटामध्ये चुका आढळल्या आहेत. जिल्हा बँक, टपाल बँक यांच्या मदतीने तसेच शेतक ऱ्यांनी स्वत:हून केल्याने सुमारे ३७ हजार शेतक ऱ्यांच्या डाटातील चुकांची दुरुस्ती केली गेली आहे. अद्यापि सुमारे ४० हजार शेतक ऱ्यांच्या डाटातील दुरुस्तीचे काम बाकी आहे.