20 November 2019

News Flash

वाढदिवसानिमित्त स्पेशल व्यक्ती काही भेटवस्तू मिळाली का?, आदित्य ठाकरे म्हणाले…

त्यांनी हसतमुखाने प्रतिनिधींसमोर हात जोडले आणि यानंतर एकच हशा पिकला. 

संग्रहित छायाचित्र

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज (गुरुवारी) वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त स्पेशल व्यक्तीकडून काही भेटवस्तू मिळाली का, असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी ‘तुम्ही आलात ना’, असे सांगितले. यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर हसतमुखाने हात जोडले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.

आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. आदित्य ठाकरे यांना एका पत्रकाराने वाढदिवसानिमित्त स्पेशल व्यक्तींकडून काही भेटवस्तू मिळाली का असा प्रश्नही विचारला. यावर आदित्य ठाकरे यांनी ‘तुम्ही आलात ना’, असे उत्तर दिले. यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी आणखी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हसतमुखाने प्रतिनिधींसमोर हात जोडले आणि यानंतर एकच हशा पिकला.

काही दिवसांपूर्वी दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे हे एका हॉटेलमध्ये डिनरला एकत्र गेले होते. हे फोटो व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी हे उत्तर दिले.

दरम्यान, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि दुष्काळ यासंदर्भात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यावरही मी त्यांची भेट घेणार आहे, असे त्यांनी सांगितले. विधानसभेत जाणार का, या प्रश्नावर त्यांनी हे विधान केले. विधानसभा निवडणूक लढवणार का, शिवसेना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, या प्रश्नांचे उत्तर देणे त्यांनी टाळले.

First Published on June 13, 2019 1:52 pm

Web Title: aaditya thackeray birthday gift from special person
Just Now!
X