नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी ट्विट करुन या संदर्भातली माहिती दिली. पण त्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

आदित्य ठाकरे ट्विटमध्ये काय म्हणाले आहेत?

Kiritkumar Shinde Resigns From MNS
कीर्तिकुमार शिंदेंचा मनसेला अलविदा! पोस्ट शेअर करत म्हणाले, “राज ठाकरेंच्या अनाकलनीय भूमिकांचं..”
Raj Thackeray
“शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण
veer savarkar poem memory
वीर सावरकरांची ‘सागरा प्राण तळमळला’ कविता, लता मंगेशकरांनी सांगितलेली आठवण आणि शंकर वैद्यांनी उलगडलेला अर्थ
shrikant shinde uddhav thackeray omar abdullah
“ओमर अब्दुल्लांना जाब विचारण्याची हिंमत तरी ठेवा”, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना’त्या’ विधानावरून टोला!

“एकनाथ शिंदेजी काळजी घ्या, गेले सहा महिने करोनाविरोधाला लढा आपण देखील फ्रंटलाइनवरुनच लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल याची मला खात्री आहेच. पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा.”

आदित्य ठाकरेच नाही तर उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार विश्वजीत कदम आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही एकनाथ शिंदे यांना लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधल्या चार मंत्र्यांना करोनाची बाधा झाली. आता आज एकनाथ शिंदे यांनाही करोनाची बाधा झाली आहे. नितीन राऊत, हसन मुश्रीफ, बच्चू कडू आणि वर्षा गायकवाड या चार मंत्र्यांना मागील पाच ते सहा दिवसांमध्ये करोनाची बाधा झाली. आता आज एकनाथ शिंदे यांचाही करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.