उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये शिवभोजन थाळी या योजनेचा शुभारंभ केला. मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृह येथे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ झाला. या योजनेअंतर्गत नागरिकांसाठी १० रुपयांत आहार मिळणार आहे. उद्घाटनानंतर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ही थाळी कोणतेही निकष न लावता सर्वांसाठी आहे. बस आणि मर्सिडीजमधून उतरलेल्यांनाही याचा आस्वाद घेता येईल.

राज्यात आमची सत्ता येताच गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी आणणार, अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्या घोषणेनुसार राज्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत शुभारंभ झाला. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. ‘पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. शिवभोजन थाळी प्रत्येकासाठी आहे. ज्याला भूक लागली त्याला ही थाळी मिळेल. त्यासाठी कुठेही आर्थिक स्थिती, जात आणि धर्माची अट नाही. ज्याला भूक असेल त्याला थाळी मिळेल. मर्सिडीज किंवा बसमधूनही उतरलेला असेल आणि ज्याला भूक असेल त्याला ही थाळी मिळेल,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पुण्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी जनतेला विनंती केली की, ज्याची ऐपत असेल त्यांनी या थाळीचा आस्वाद घेऊ नये. निवडणुकीपूर्वी शिवभोजन थाळी देणार, त्या घोषणेप्रमाणे आम्ही गोरगरिबांसाठी थाळी देत आहोत. या थाळीचा गरीब होतकरू यांनी लाभ घ्यावा, ज्यांची ऐपत आहे. त्यांनी लाभ घेऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. तसेच यामध्ये काही त्रुटी असल्यास त्याचा देखील विचार करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा : पुण्यात अजित पवारांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन 

पुण्यात शिवभोजन थाळी कुठे मिळेल?