जिल्हाधिका-यांच्या कार्यालयामध्ये जाण्यास मज्जाव करणा-या शिपायाचा आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याने चावा घेतल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
सुभाष देशमुख या आप कार्यकर्त्याने गोविंद चव्हाण यांचा चाव घेतल्याने ते जखमी झाल्याचे कळते. गेल्या काही दिवसांपासून अमरावती येथील तहसीलदार कार्यालयासमोर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. याप्रकरणी आपचे कार्यकर्ते सुभाष देशमुख जिल्हाधिकाऱयांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. कार्यालयीन वेळ असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्या-यांची गर्दी झाली होती. त्यामुळे, शिपाई गोविंद चव्हाण याने देशमुख यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोविंदच्या गालाचा लचका तोडला. पोलिसांनी देशमुख यांच्या तावडीतून शिपायाची सुटका केली. गाडगेनगर पोलिसांनी देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.