News Flash

‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात तुकोबारायांच्या पादुका माऊलींच्या भेटीसाठी रवाना

करोना निर्बंधांमुळे यंदाही पालखी एसटीतूनच पंढरपूरला जाणार आहे

एसटीमधून पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.

संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एसटीने पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. 1 जुलै रोजी तुकोबांचा पालखी सोहळा मुख्य मंदिरात पार पडला होता. दरम्यान, करोनाचं संकट असल्याने यावर्षी देखील पालखी मुख्य मंदिरात विसावल्या होत्या. तर, आज एसटीमधून ग्यानबा तुकाराम म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.

1 जुलै पासून देहूच्या मुख्य मंदिरात गोल रिंगण, मेंढ्यांच रिंगण, अश्वाच रिंगण असे सोहळे पार पडले आहेत. हे सर्व सोहळे दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी जाते तेव्हा पार पडत असतात. परंतु, यावर्षी देखील करोनाचं संकट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे.

हेही वाचा – पंढरपूरची वारी पोहोचली सर्वोच्च न्यायालयात; ठाकरे सरकारच्या निर्णयाला आव्हान

आज सकाळी मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी इनामदार वाड्यात टाळ मृदंगाच्या गजरात पोहचली. तिथे पादुकांची आरती करून झाल्यानंतर एसटीमध्ये पादुका विसावल्या. तुकोबांचा जयघोष करत ग्यानबा तुकारामाने परिसर दुमदुमून गेला होता. एसटीमधून पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 10:09 am

Web Title: aashadhi ekadashi pandharpur waari tukaram maharaj sant tukaram vsk 98 kjp 91
Next Stories
1 गोष्ट दहावी नापास तरुणाची! जिद्दीच्या जोरावर MPSC त मिळवलं यश; बनला अधिकारी
2 “मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर”
3 उपेक्षित वर्गातील कलाकारांसाठी ‘कलाविश्व’!