06 August 2020

News Flash

हरिभाऊ बागडेंवर टीका करताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली

हरिभाऊ बागडे यांच्या व्यंगावर अब्दुल सत्तार यांची टीका

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंवर टीका करताना माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आहे. हे सरकारच नाही तर या सरकारचा अध्यक्षही बहिरा आहे अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यात झालेल्या सभेत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी केल्याचं कारण विचारल्यानंतर व्यंगात्मक टीका करत सत्तार यांनी हरिभाऊ बागडेंवर टीका केली आहे.

या सरकारचा अध्यक्ष बहिरा आहे, मी या अध्यक्षांना शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी का झाली हा प्रश्न विचारला तर मला ते म्हटले बसा खाली. यांना काही ऐकूच येत नाही. मग तो शिवस्मारकाबद्दलचा प्रश्न असो किंवा जनतेचे प्रश्न. लोकसभा निवडणुकांचे घोडामैदान जवळ आले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी एकमेकांवर चिखलफेक केली जाते आहे. अब्दुल सत्तार यांची टीका याच चिखलफेकीचा एक भाग आहे.

राज पुरोहित यांनीही प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वढेरा यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. आज हरिभाऊ बागडे यांच्याबाबत भाष्य करताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली. हरिभाऊ बागडे यांना कमी ऐकू येतं हे सगळ्या महाराष्ट्रालाच ठाऊक आहे. आता हरिभाऊ बागडे यांच्या याच व्यंगावर बोट ठेवत अब्दुल सत्तार यांनी टीका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2019 4:27 pm

Web Title: abdul sattar controversial statement about haribhau bagde in aurangabad
Next Stories
1 लोकसभा निवडणूक लढवणार की नाही?, शरद पवार म्हणतात…
2 राम मंदिराचा विषय हिंदुत्ववाद्यांनीच गुंडाळून ठेवला, शिवसेनेचा आरएसएस, मोदी सरकारवर आरोप
3 देशात जातीय दंगली घडवून आणण्याची शक्यता – छगन भुजबळ
Just Now!
X