News Flash

अभिजीत बिचुकलेची कळंबा कारागृहात रवानगी

खटल्याची पुढील सुनावणी दि.२७ जून रोजी होणार

अभिजीत बिचुकले

चेक बाउन्सप्रकरणी जामीन मिळालेल्या आणि २०१२ मधील खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या तसेच बिग बॉस या रिअॅलिटी शोचा स्पर्धक राहिलेल्या अभिजीत बिचुकलेची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात रवानगी केली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बिचुकलेचा शनिवारी पहाटे रक्तदाब वाढल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची तपासणी करून तो फिट असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सकाळी ११ वाजता त्याला न्यायालयात हजर केले गेले. यावेळी न्यायालयाने बिचुकलेला चेक बाउन्स प्रकरणात जामीन मंजूर केला. मात्र, २०१२ मध्ये फिरोज पठाण यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही बिचुकले हा न्यायालयीन कामकाजात हजर राहत नव्हता. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.

अभिजीत बिचुकलेवर आणखी काही गुन्हे आहेत का ? याची पडताळणी केली असता, खंडणी प्रकरणात त्याला वॉरंट बजावले असल्याचे समोर आले. त्यामुळेच त्याची रवानगी जिल्हा रूग्णालयातील कोठडीत करण्यात आली होती. दरम्यान आज (सोमवार) संध्याकाळी त्याला जामीन मिळेल अशी अशा बिग बॉसच्या प्रेक्षकांना होती. मात्र या खटल्याची पुढील सुनावणी दि.२७ जून रोजी होणार आहे. तर डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो फिट असल्याचे सांगितल्यानंतर संध्याकाळी त्याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 9:36 pm

Web Title: abhijit bichukale sent to jail msr87
Next Stories
1 पाताळगंगा नदीत बुडून दोन बहिणींचा मृत्यू
2 राज्याला ६ हजार ५९७ टँकर द्यावे लागतायत; लाज वाटायला हवी सरकारला – जयंत पाटील
3 मुखमंत्र्यांना आंघोळीला उशीर होता कामा नये, त्यांचं पाणी बिल मी स्वतः भरणार – जितेंद्र आव्हाड
Just Now!
X