शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने दिला जाणारा बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार यंदा पर्यावरण विषयावर लेखन करणारे ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहसंपादक अभिजीत घोरपडे यांना जाहीर झाला आहे. रविवारी सायंकाळी परशुराम साईखेडकर नाटय़ मंदिरात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
सात हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पत्रकारिता क्षेत्रात जवळपास १७ वर्षांचा अनुभव असणाऱ्या घोरपडे यांनी पर्यावरण विषयावर विपूल लेखन केले. त्यांच्या या कामाची दखल पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आल्याचे वाचनालयाचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी नमूद केले. दरम्यान, या सोहळ्याप्रसंगी सावानातर्फे दरवर्षी जुन्या पिढीतील निष्णात वकील काकासाहेब आकूत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होणारे व्याख्यान होणार आहे. यंदा ज्येष्ठ पत्रकार व लेखक अरविंद गोखले यांचे ‘जबाबदार आणि बेजबाबदार पत्रकारिता’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
FIR registered, Dhirendra Shastri Bageshwar Baba, mohadi police station, bhandara district, controversial statement
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान