काशिमीरा पोलीस ठाण्यात एका २५ वर्षीय महिलेला हुंडय़ासाठी होणाऱ्या छळामुळे गर्भपात झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात पती आणि इतर सासरच्या मंडळींच्या विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना काशिमीरा पोलिसांनी सांगितले की, मीरा रोड पूर्व परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींकडून हुंडय़ासाठी त्रास दिला जात होता. तिचे सासू-सासरे, नणंद, पती तिला वारंवार पैशाची मागणी करत होते. त्यावरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. ती गर्भवती असतानासुद्धा तिला त्रास देत होते. ९ जानेवारी रोजी अशाच स्वरूपाचे भांडण झाले असता सासूने तिच्या पोटात लाथ मारल्याने तिचा गर्भपात झाला. फिर्यादी महिला पोलीस ठाण्यात आल्यावर तिच्या माहितीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन पोतदार यांनी दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 12:07 am