News Flash

आघाडी तोडण्याचे पाप काँग्रेसचेच- आर. आर.

राज्यातील आघाडी तोडण्याचे पाप काँग्रेसचेच असून या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक नंबरचा शत्रू काँग्रेसच असेल असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

| September 27, 2014 02:40 am

राज्यातील आघाडी तोडण्याचे पाप काँग्रेसचेच असून या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक नंबरचा शत्रू काँग्रेसच असेल असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलतांना सांगितले. राज्यात या निवडणुकीत राष्ट्रवादीच एक नंबरचा पक्ष म्हणून पुढे येईल असेही त्यांनी सांगितले.
श्री. पाटील यावेळी म्हणाले की, आघाडी टिकविण्याची केवळ राष्ट्रवादीचीच जबाबदारी नव्हती, काँग्रेसचीही जबाबदारी होती. पक्षाचे नेते शरद पवार यांचा अपमान काँग्रेसने केला असून त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. यापुढील काळात राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावेल. पुरोगामी शक्तींची मदत घेऊन हे कार्य आम्ही पार पाडू असे सांगत आबांनी निवडणुकीच्या प्रचारात आघाडी तोडण्याचे पाप करणाऱ्या काँग्रेसवरच आमचा टीकेचा जोर राहणार असल्याचे सूतोवाच केले.
काँग्रेसने एकीकडे आमच्याशी चच्रेचे नाटक करीत असताना गेली १५ वष्रे सोबत असणाऱ्या पक्षाला विश्वासात न घेता परस्पर आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्याची घाई केली. त्यांनाच मुळात आघाडी टिकवायची नव्हती हेच यावरून सिद्ध होते असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 2:40 am

Web Title: absolve congress to alliance cut r r patil
Next Stories
1 महायुतीच्या फुटीने कोल्हापुरात उमेदवार शोधासाठी धावपळ
2 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उंडाळकर अर्ज भरणार
3 स्वबळावरील लढतीने सोलापुरात राजकीय समीकरणे बदलली
Just Now!
X